notifications

  • No new notifications
IIT Bombay students submit 18 demands
24 September, 2026 14:32

आयआयटी मुंबईमधील साहिलच्या मृत्यूनंतर ‘विद्यार्थी कल्याण’, वैद्यकीय सुविधा आणि प्रशासनाच्या जबाबदारीबाबत तातडीने बदलाची मागणी करून संस्थेसमोर १८ मागण्या ठेवल्या. त्यातील १० मागण्या महिनाभरात पूर्ण न झाल्यास संचालक, अधिष्ठाता (विद्यार्थी व्यवहार), अधिष्ठाता (शैक्षणिक कार्यक्रम) यांनी राजीनामा द्यावा, अशी आक्रमक भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीबाबत साप्ताहिक माहिती विद्यार्थ्यांना द्यावी, अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे.साहिलच्या मृत्यूमुळे आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी आयआयटी प्रशासनाकडे १८ मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. त्यात साहिलच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या समितीत प्राध्यापक, विद्यार्थी प्रतिनिधी, बाह्य सदस्य तसेच विद्यार्थी प्रतिनिधींनी सुचविलेले सदस्य असावेत.

साहिलला आपत्कालीन परिस्थितीत मिळालेली मदत आणि रुग्णालयातील प्रतिसादाचाही चौकशीत समावेश करावा. चौकशीची प्रक्रिया आणि निष्कर्ष १५ ऑक्टोबरपूर्वी सार्वजनिक करावेत. तसेच ३० सप्टेंबरपूर्वी अंतरिम अहवाल सादर करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. चौकशी सुरू असेपर्यंत प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांना निलंबित करावे, तसेच दोषींना पदांवरून हटवावे, संबंधित समित्यांमध्ये विद्यार्थी प्रतिनिधींना मतदानाचा अधिकार द्यावा, या समित्यांमध्ये विद्यार्थ्यांचे समान प्रतिनिधित्व असावे. विद्यार्थ्यांच्या मतावर प्रशासनाला व्हेटोचा अधिकार नसावा आणि समितीचे अहवाल सर्व सदस्यांनी स्वाक्षरी करून मंजूर करावेत, विद्यार्थ्यांशी कोणतीही चर्चा न करता लागू करण्यात आलेले निर्णय पुन्हा तपासावेतविद्यार्थी कल्याण, वैद्यकीय सुविधेसह अठरा मागण्यांसाठी आयआयटी मुंबईचे विद्यार्थी आक्रमकआयआयटी मुंबईमधील साहिलच्या मृत्यूनंतर ‘विद्यार्थी कल्याण’, वैद्यकीय सुविधा आणि प्रशासनाच्या जबाबदारीबाबत तातडीने बदलाची मागणी करून संस्थेसमोर १८ मागण्या ठेवल्या.

मुंबई : आयआयटी मुंबईमधील साहिलच्या मृत्यूनंतर ‘विद्यार्थी कल्याण’, वैद्यकीय सुविधा आणि प्रशासनाच्या जबाबदारीबाबत तातडीने बदलाची मागणी करून संस्थेसमोर १८ मागण्या ठेवल्या. त्यातील १० मागण्या महिनाभरात पूर्ण न झाल्यास संचालक, अधिष्ठाता (विद्यार्थी व्यवहार), अधिष्ठाता (शैक्षणिक कार्यक्रम) यांनी राजीनामा द्यावा, अशी आक्रमक भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीबाबत साप्ताहिक माहिती विद्यार्थ्यांना द्यावी, अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे.



साहिलच्या मृत्यूमुळे आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी आयआयटी प्रशासनाकडे १८ मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. त्यात साहिलच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या समितीत प्राध्यापक, विद्यार्थी प्रतिनिधी, बाह्य सदस्य तसेच विद्यार्थी प्रतिनिधींनी सुचविलेले सदस्य असावेत.


साहिलला आपत्कालीन परिस्थितीत मिळालेली मदत आणि रुग्णालयातील प्रतिसादाचाही चौकशीत समावेश करावा. चौकशीची प्रक्रिया आणि निष्कर्ष १५ ऑक्टोबरपूर्वी सार्वजनिक करावेत. तसेच ३० सप्टेंबरपूर्वी अंतरिम अहवाल सादर करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. चौकशी सुरू असेपर्यंत प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांना निलंबित करावे, तसेच दोषींना पदांवरून हटवावे, संबंधित समित्यांमध्ये विद्यार्थी प्रतिनिधींना मतदानाचा अधिकार द्यावा, या समित्यांमध्ये विद्यार्थ्यांचे समान प्रतिनिधित्व असावे. विद्यार्थ्यांच्या मतावर प्रशासनाला व्हेटोचा अधिकार नसावा आणि समितीचे अहवाल सर्व सदस्यांनी स्वाक्षरी करून मंजूर करावेत, विद्यार्थ्यांशी कोणतीही चर्चा न करता लागू करण्यात आलेले निर्णय पुन्हा तपासावेत.




हेही वाचा

देशात सीएना मागणी; विविध कंपन्यांमध्ये १२ हजारांहून अधिक नोकऱ्या उपलब्ध; मात्र उमेदवार ५ हजार ८३४

या निर्णयांचा फेरआढावा घेताना विद्यार्थ्यांचे मत विचारात घ्यावे, प्राध्यापकांविरोधात तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया निश्चित करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी. तक्रारींच्या तपासणीसाठी निश्चित कालमर्यादा असलेली पुढील कार्यवाहीची प्रक्रिया तयार करावी, प्रत्यक्ष समुपदेशन सुविधा, २४/७ मानसोपचारतज्ज्ञ, अधिक सुसज्ज रुग्णालय, विद्यार्थ्यांबरोबरच प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना मानसिक आरोग्य प्रशिक्षण अनिवार्य करण्यात यावे, अधिष्ठाता (विद्यार्थी व्यवहार) कार्यालयाकडून विशेष वेळ मिळावी या मागण्या महिनाभरामध्ये पूर्ण करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या सर्व मागण्यांच्या अमलबजावणीबाबत साप्ताहिक माहिती विद्यार्थ्यांना देण्यात यावी.


मागण्या मान्य न झाल्यास संचालक, अधिष्ठाता (विद्यार्थी व्यवहार), अधिष्ठाता (शैक्षणिक कार्यक्रम) यांचा राजीनामा मागण्यात येईल, असा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे. शांततापूर्ण आंदोलनात सहभागी झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्यावर शिस्तभंगाची, वसतिगृहाशी संबंधित, आर्थिक किंवा कायदेशीर कारवाई करू नये. अप्रत्यक्ष स्वरूपाची शिक्षाही देऊ नये, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. याबाबत प्रशासनाने लेखी हमी द्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.




Proudly made in India.

Copyright © 2026 MumbaiProfessors All Right Reserved.

2026